Tuesday, May 17, 2022

कृतज्ञ व्हावे

ह्या जगात मिळालेल्या जन्मासाठी,
पालकांनी केलेल्या संगोपनासाठी,
लाडीगोडी लावणाऱ्या आजी आजोबांसाठी,
बहीण-भावंडांच्या अमाप अथांग प्रेमासाठी,
कृतज्ञ व्हावे……….

आपल्याला विद्या देऊन घडवणारे शिक्षकांप्रती,
मैत्रीचे अतूट नाते आपुलकीने जपणाऱ्यांप्रती,
आयुष्यभर क्षणोक्षणी साथ देणाऱ्या जोडीदाराचे,
आपल्याहून लहान असलेल्यांकडून अनुभवलेल्या गोष्टींसाठी,
कृतज्ञ व्हावे……….

जीवनाच्या प्रवासाचे अनुभव सांगणाऱ्यांचे,
आपले शिखर गाठण्यासाठी भेटलेल्या सल्लागारांचे,
सामाजिक बांधिलकी असलेल्या बांधवांच्या परोपकारासाठी,
आजीवन अनुभवलेल्या अनमोल प्रसंगांसाठी,
कृतज्ञ व्हावे……….

स्वतःच्या आयुष्यातील स्वर्ग अनुभवावे,
अमूल्य अश्या गोष्टींसाठी कृतज्ञ व्हावे……….

अशी सस्नेही शुभेच्छा………………

    Leave a Reply