Tuesday, May 17, 2022

  वाटसरू

  आयुष्य म्हणजे प्रवास असे म्हंटले तर, आपण जीवनाच्या वाटेवर चालणारे वाटसरू !

  ….आणि या प्रवासात आपल्या वाटेला अनुभवाला येणारी झाडांची (मायेची) सावली, साजेसे (प्रेमाचे) कोवळे ऊन, वाढत्या वयासोबत येणारी लहान-मोठी नागमोडी (जबाबदारीची) वळणे, कधी कट्या-कुंपणात (अडी-अडचणीत) चालण्याची कुशलता, तर कधी आडवाटांचा अभ्यास, लहान मोठे दगड धोंडे मागे टाकत निखळ वाहणारे पाण्याचे (यशाचे आणि सुखाचे) झरे !

  आहोत कि  नाही आपण आपल्याच आयुष्याचे वाटसरू !

  जसा वाटसरू आपली वाट शोधायचा प्रयत्न करत असतो, तसेच आपण सतत काही ना काही शोधत असतो. नोकरी… ती मिळाली की बढती… पैसा मिळवण्याची नवीन वाट….. अश्या अनेक गोष्टी… पण, या सर्व शोधा-शोधी मध्ये निखळ आनंद शोधण्याचा प्रयत्न केला आहे काय?  त्याच प्रमाणे, रोजच्या आयुष्यात काही प्रश्न आपल्याला पडत असतात पण आपल्या धावपळीत सगळे अनुत्तरित राहून जातात.  तसेच, अनेक गोष्टींची माहिती आपल्याला घ्यावीशी वाटते पण ते शक्य होत नाही.

  अनेक कथा, कविता, करमणूक, आपल्या इतिहासातील काही गोष्टी….. आर्थिक घडामोडी, कर, आकार, गुंतवणूक, तज्ञांचे मार्गदर्शन, शरीर स्वास्थ्य, मानसिक स्वाथ्य, निसर्ग, प्रवास आणि बरेच काही आहे जे वाचण्याजोगे आहे पण आज ते विस्मृतीत गेले आहे.  अश्याच काही गोष्टी आम्ही येथे संग्रहीत करत आहोत.

  आयुष्याचा प्रवास सुखकर करण्याचा वाटसरूचा हा छोटासा प्रयत्न…….